छावा Marathi book review in Marathi
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आणि शिवाजी सावंत लिखित “छावा“(छावा – शिवाजी सावंत छावा Marathi book review in Marathi) ही एक कादंबरी नसून एक प्रेरणा आहे. शिवाजी सावंत यांनी ह्या कादंबरीची रचना अशी केली आहे की, पिढ्यान् पिढ्या जातील, पण ह्या कादंबरीतील इतिहास कधीही जुना होणार नाही. कधी आत्मविश्वास हरवला असेल, जीवनात सगळं काही संपल्यासारखं वाटत असेल, तर तरुण पिढीने एकदा आपल्या राजेंचा इतिहास वाचला पाहिजे.

छावा – शिवाजी सावंत | छावा Marathi book review in Marathi
छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्याचे दुसरे छत्रपती. त्यांचं हे वादळी व्यक्तिमत्त्व “छावा” ह्या कादंबरीत परिपूर्णपणे मांडले आहे. संभाजी महाराजांचं जीवन लहानपणापासूनच खूप खडतर होतं. त्यांची आई राजे दोन वर्षांचे असतानाच निधन पावली. राजमाता जिजाबाई यांचा त्यांना सहवास लाभला. शिवाजी महाराजांसोबत आग्र्याला गेले, तेथून सुटून ते मथुरेत एकटेच राहिले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर ज्या प्रकारे छत्रपती संभाजी महाराजांनी पाच शाह्यांशी लढा दिला – फ्रेंच, डच, इंग्रज, पोर्तुगीज, मुघल – आणि अजून एक लढाई म्हणजे स्वतःच्या घरातील कट-कारस्थान करणाऱ्या लोकांशी सुद्धा होती. नऊ वर्षे दख्खनमध्ये उतरलेल्या औरंगजेबाशी व इतर चार शाह्यांशी लढले. पण संगमेश्वरला धोक्याने त्यांना पकडवण्यात आलं, ज्यामुळे औरंगजेबाने त्यांची क्रूर हत्या केली.
ही कादंबरी केवळ इतिहास नव्हे, तर एका योद्ध्याच्या जिद्दीची, त्यागाची आणि अपार धैर्याची गाथा आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी संकटांना कसे सामोरे गेले, अन्यायाविरुद्ध कसे उभे राहिले आणि अखेरच्या श्वासापर्यंत स्वराज्यासाठी लढा दिला, हे जाणून घ्यायचं असेल, तर “छावा” वाचलीच पाहिजे.
ही केवळ कथा नाही, तर आत्मविश्वास गमावलेल्या प्रत्येकासाठी प्रेरणादायी प्रकाश आहे. इतिहासाच्या पानांमधून स्फूर्ती मिळवायची असेल, तर ही कादंबरी तुमच्या मनात नवचैतन्य निर्माण करेल.
“परिस्थिती कितीही कठीण असली, तरी जो झुकत नाही, तोच खरा छावा!”
पुस्तक खरेदीसाठी खालील लिंकवर क्लिक करा. 📖👇
आमचे इतर लेख वाचण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर click करा.
सदैव जिंकणारी ती – मराठी कविता
Review By – Ravi Khapre