Introduction:
महिला दिन निमित्त आम्ही तुमच्यासाठी एक सुंदर मराठी कविता (Marathi poem on Women’s Day) घेऊन आलो आहोत. ही कविता women empowerment, strength आणि success चं एक प्रतीक आहे. समाजातील अडथळ्यांवर मात करणारी आणि स्वतःची ओळख निर्माण करणारी व प्रत्येक strong and independent woman साठी ही कविता त्यांच्यासाठी दिलेला एक आदरपूर्वक सन्मान आहे. ह्या कवितेतून तिच्या संघर्षाची आणि जिद्दीची प्रेरणादायी कथा उलगडते. पण ही कविता वाचण्या आधी आपण थोडक्यात Women’s Day कधी पासून आणि का साजरा केला जातो ते पाहू.
दरवर्षी ८ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. १९०८ साली अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात महिलांनी आपल्या हक्कांसाठी मोठा मोर्चा काढला होता. त्यांच्या संघर्षाची दखल घेत १९१० मध्ये क्लारा झेटकिन या जर्मन समाजसेविकेने महिला दिन जागतिक स्तरावर साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला. अखेर १९७७ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने (UN) ८ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून अधिकृत मान्यता दिली.
भारतात महिला दिन कधी सुरू झाला?
भारतात महिला हक्क आणि समानतेच्या चळवळीला चालना देण्यासाठी १९७५ पासून महिला दिन साजरा केला जात आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने १९७५ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय महिला वर्ष’ म्हणून जाहीर केल्यानंतर, भारतात महिलांच्या सशक्तीकरणासाठी विविध मोहिमा आणि कायदे आणले गेले. यामध्ये स्त्री-शिक्षण, महिलांचे मतदान हक्क, कार्यस्थळी समान संधी यांसारख्या विषयांवर भर देण्यात आला. आजही हा दिवस महिलांच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय सशक्तीकरणासाठी महत्त्वाचा ठरतो.
भारताच्या विकासात मोठे योगदान देणाऱ्या महिला
भारतात अनेक महिलांनी शिक्षण, विज्ञान, राजकारण, समाजकार्य आणि उद्योजकता यांसारख्या क्षेत्रांत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांचे कार्य देशाच्या प्रगतीसाठी मार्गदर्शक ठरले आहे.
🔹 सावित्रीबाई फुले – भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, महिलांसाठी आणि दलितांसाठी शिक्षणाची दारे खुली केली.
🔹 इंदिरा गांधी – भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान, देशाच्या राजकारणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
🔹 कल्पना चावला – पहिली भारतीय अंतराळवीर महिला, तिने अंतराळात भारताचे नाव उज्ज्वल केले.
🔹 मदर तेरेसा – समाजसेविका, गरिबांसाठी आणि निराधारांसाठी संपूर्ण आयुष्य वाहिले.
🔹 लता मंगेशकर – भारताची ‘सुरसम्राज्ञी’, संगीत क्षेत्रात अमूल्य योगदान दिले.
या सशक्त महिलांनी भारताच्या विकासात मोठे योगदान दिले आहे आणि आजही अनेक महिला त्यांच्या पावलावर पाऊल टाकून पुढे जात आहेत. त्यामुळे आज महिला दिन निमित्त त्यांच्या सन्मानार्थ एक छोटीशी कविता (Marathi Poem on Women’s Day) ह्या ब्लॉग पोस्ट द्वारे लिहिली आहे.
सदैव जिंकणारी ती! (Marathi poem on women’s day)
परंपरेच्या जोखड्यातून रखडलेली नारी ती,
परिस्थितीला मात देत, सदैव जिंकणारी ती!
एक हाती भरली ओटी, दुसऱ्या हाती पुस्तक पाटी
बंधनाचा आरसा मोडूनी, सदैव जिंकणारी ती!
अपेक्षेचा डोंगर ठेऊनी, टप्या-टप्या ने पार करते ती,
दुनियेच्या वाईट नजरेला वाचूनी, सदैव जिंकणारी ती!
ती म्हणजे निर्मिती,
ती म्हणजे देशाची प्रगती.
ती म्हणजे मार्गदर्शनी,
ती म्हणजे विश्वशक्ती!
काळोख्याला मात देणारी,
आकाशात उंच भरारी घेणारी,
जुन्या रूढींना कापत, सदैव जिंकणारी ती…
ती म्हणजे नारी!
कवितेतील शब्द निवड खूपच योग्य आहे व कवितेतील भावना खूपच सुंदर आणि मनाला स्पर्शून गेल्या, मला खूप आवडली
❤️