एक स्वप्नातलं घर! Marathi poem on home

 


 माझ्या घरची वृंदा (Marathi poem on home)

वृंदा, तीच घरात पदार्पण होताच घराला घरपण आलं,
मनात गिरवलेल्या घराचं स्वप्न आता पूर्ण झालं.

तिच्या सानिध्यात संपूर्ण घराला महत्त्व आलं,
प्रदक्षिणा घालुनी तिच्या भोवती कुटुंब सारं मंत्रमुग्ध झालं.

टेकवली ही वृंदा माऊलीच्या दारी,
विठ्ठलाची आळंदी आता कशी प्रफुल्लित झाली सारी.


 एक स्वप्नातलं घर !       

 (एक स्वप्नातलं घर! Marathi poem on home)

माझं घर
आईच्या डोळ्यात पाहिलेलं एक स्वप्न,
बाबांच्या मेहनती हातांच्या रेषांवर उभं केलेलं घरटं!

माझं घर
संस्कृतीच्या कुशीत
आणि मायेच्या उबदार वस्तीत वसलेलं!

माझं घर
आयुष्याच्या नाटकात
महत्त्वाचं पात्र असलेलं!

माझं घर
प्रत्येक कोपरा आठवणींनी साठवलेलं!


घर जस की (Marathi kavita on ghar )

आयुष्याच्या सुरुवातीचं
पहिलं पान असतं.

दोन शब्दांत व्यक्त करणारं
एक जिव्हाळ्याचं नातं असतं.

आनंदी संसाराचं पहिलं पाऊल असतं,
मायेच्या सावलीतलं घरटं असतं.

नात्यातल्या झरोक्यातून वाहणारं प्रेमाचं वारं असतं,
कारण घर म्हणजे, आयुष्यातलं पहिलं जिव्हाळ्याचं नातं असतं.

इतर मराठी कविता वाचण्यासाठी

सदैव जिंकणारी ती – मराठी कविता

Leave a Comment