Court: State Vs. A Nobody चित्रपटाचा मराठी भाषेत review
तेलुगू सिनेमातील कोर्टरूम ड्रामा प्रकारातील “Court: State Vs. A Nobody” हा चित्रपट एक उत्तम आणि विचारप्रवृत्त करणारा चित्रपट आहे. (Court: State Vs. A Nobody movie review in Marathi) नवोदित दिग्दर्शक राम जगदीश यांनी समाजातील संवेदनशील मुद्द्यांना हात घालत एक उत्कृष्ट विषय आपल्या समोर सादर केला आहे जो प्रेक्षकांना भावनिक आणि बौद्धिक पातळीवर गुंतवून नेऊन ठेवतो. नानीच्या वॉल पोस्टर सिनेमाच्या प्रोडक्शनमुळे या चित्रपटाला व्यावसायिक आणि कलात्मकदृष्ट्या विशेष स्थान मिळाले आहे. त्यामुळे नेटफ्लिक्सवर 11 एप्रिल 2025 रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट प्रेक्षकांमध्ये एक चर्चेचा विषय बनला आहे.
Court: State Vs. A Nobody चित्रपटाचा मराठी भाषेत review
कथा
“Court: State Vs. A Nobody” ही कथा विशाखापट्टणम येथे 2013 मध्ये घडते आणि ती 19 वर्षीय मेट्टू चंद्रशेखर उर्फ चंदू (हर्ष रोशन) याच्याभोवती फिरत असून जो एका वॉचमनचा मुलगा असतो आणि विविध छोटी-मोटी कामे करून आपला उदरनिर्वाह करतो. चंदूचा साधा आणि प्रामाणिक स्वभाव त्याला जाबिली (श्रीदेवी अपल्ला) नावाच्या 17 वर्षीय मुलीच्या जवळ आणतो जी एका प्रभावशाली आणि उच्चवर्णीय कुटुंबातील मुलगी असते. त्यांच्या निरागस मैत्रीला प्रेमाचे स्वरूप येताच जाबिलीचा कट्टर आणि वर्चस्ववादी काका मंगापती (शिवाजी) याला हे नातं कुटुंबाच्या सन्मानाला काळिमा फासणारे वाटू लागते म्हणून आपल्या सामाजिक प्रतिष्ठेच्या अहंकारातून तो चंदूवर POCSO कायद्याखाली (Protection of Children from Sexual Offences Act) खोटा आरोप लावतो ज्यामुळे चंदूला अटक होते.
Court: State vs A Nobody | Trailer | Nani, Priyadarshi | Netflix India
त्यानंतर कथानक एका तीव्र कोर्टरूम ड्राम्यात प्रवेश करते जिथे कनिष्ठ वकील सूर्या तेजा (प्रियदर्शी पुलिकोंडा) चंदूसाठी लढतो. सूर्या स्वतः एका सामान्य कुटुंबातून आलेला असल्यामुळे त्याला स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी हवी असते. या खटल्यात तो केवळ मंगापतीच्या प्रभावशाली शक्तींशीच लढत नाही तर सामाजिक आणि कायदेशीर व्यवस्थेतील भ्रष्टाचाराशीही सामना करतो. ही कथा चंदूच्या निरपराधीपणाची लढाईआणि POCSO कायद्याच्या गैरवापर ह्या अत्यंत गंभीर परिणामांभोवती फिरत असते.
चित्रपटाची कथा दोन भागांमध्ये विभागली गेली आहे जसे की पहिला भाग चंदू आणि जाबिलीच्या नात्याचा आणि पार्श्वभूमीचा परिचय करून देते तर दुसरा भाग कोर्टरूममधील तीव्र वादविवाद आणि case slove कशी केली जाते ह्यावर केंद्रित केली गेली आहे . कथा केवळ कायदेशीर लढाईपुरती मर्यादित नसून तर किशोर वयात असलेलं प्रेम, सामाजिक विषमता, वर्गभेद आणि कायद्याचा गैरवापर अशा व्यापक मुद्द्यांना स्पर्श करते.

अभिनय
चित्रपटातील अभिनय हा त्याचा एक प्रमुख आधारस्तंभ असतो. प्रियदर्शी पुलिकोंडा यांनी सूर्या तेजाची भूमिका अप्रतिमपणे निभावली आहे. त्यांची natural acting खरोखरच लोकांचं लक्ष वेधून घेते. कोर्टरूममधील त्यांचे संवाद आणि भावनिक दृश्ये प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. हर्ष रोशन, जो चंदूच्या भूमिकेत आहे तो एक नवोदित असूनही त्याने सुद्धा प्रभावी कामगिरी केलेली आहे. त्याचा साधा आणि प्रामाणिक अभिनय चंदूच्या निरागसपणाला जिवंत करतो. श्रीदेवी अपल्ला जाबिलीच्या भूमिकेत तितकीच उत्कृष्ट आहे विशेषतः तिच्या भावनिक दृश्यांमध्ये ती खूपच natural actress वाटते.
Court: State Vs. A Nobody movie review in Marathi
शिवाजी ह्यांनी मंगापतीची खलनायकी भूमिका खूप जबरदस्त पणे केली आहे . त्यांचा अहंकारी आणि क्रूर स्वभाव प्रत्येक दृश्यातून प्रेक्षकांमध्ये संताप निर्माण करतो. साई कुमार ज्येष्ठ वकील मोहन रावच्या भूमिकेत संयमित आणि प्रभावी अभिनयाची साथ देऊन चित्रपट आणखी खुलवतात तर रोहिणी, सुबलेखा सुधाकर आणि सुरभी प्रभावती यांनी साहाय्यक भूमिकांमध्ये कथेला भावनिक आधार दिला असून हर्षवर्धन यांनी विरोधी वकीलाच्या भूमिकेत काही ठिकाणी अतिरंजित अभिनय करुन प्रेक्षकांमध्ये संताप निर्माण करतात. परंतु ह्या संपूर्ण कलाकारांचा अभिनय चित्रपटाला उंचीवर नेऊन ठेवतो.
दिग्दर्शन आणि लेखन
नवोदित दिग्दर्शक राम जगदीश यांनी संवेदनशील विषय हाताळून चित्रपट सुर्ष्टीला एक नवीन संदेश दिला आहे. चित्रपटाची पटकथा अतिशय सुंदर असल्यामुळे विशेषतः दुसऱ्या भागात जिथे कोर्टरूममधील प्रत्येक संवाद प्रेक्षकांना विचार करायला लावतो.
राम जगदीश यांनी POCSO कायद्याचा गैरवापर आणि तरुणांच्या आयुष्यावरील होत असलेले वाईट परिणाम यावर प्रकाश टाकला आहे परंतु त्यांनी याला उपदेशात्मक स्वरूप येऊ दिले नाही. चित्रपट कायद्याच्या जटिलतेवर प्रश्न उपस्थित करतो – विशेषतः किशोरवयीन नातेसंबंधांना कायद्याच्या कसोटीवर कसे तपासले जाते आणि कायद्याची माहिती नसणे याचे गंभीर परिणाम काय होतात ते आपल्याला ह्या चित्रपटातून कळते.
“Court: State Vs. A Nobody” हा चित्रपट अनेक सामाजिक मुद्द्यांना स्पर्श करतो जसे वर्गभेद आणि सामाजिक विषमता. चंदू आणि जाबिलीच्या सामाजिक पार्श्वभूमीतील फरक म्हणजेच कथेचा केंद्रबिंदू. म्हणूनच आपल्याला हा चित्रपट दाखवतो की प्रभावशाली लोक कायद्याचा कसा गैरवापर करतात.
का पहायला हवा?
उत्कृष्ट कथा: जी कायदेशीर मुद्द्यांवर विचार करायला लावते आणि विशेषतः POCSO कायद्याच्या गैरवापराबद्दल आणि किशोरवयीन नात्यांबद्दल.
उत्कृष्ट अभिनय: प्रियदर्शी, हर्ष रोशन आणि शिवाजी यांचा प्रभावी अभिनय चित्रपटाला भावनिक बनवतो.
सामाजिक प्रासंगिकता: चित्रपट आजच्या काळातील महत्त्वाच्या मुद्द्यांना हात घालतो आणि हा विषय किशोरवयीन मुलं आणि पालकांसाठी महत्त्वाचा आहे.
नेटफ्लिक्सवर उपलब्धता: अनेक भाषांमध्ये उपलब्ध असल्याने हा चित्रपट व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो.
Watch the trailer: Court: State Vs. A Nobody
चित्रपट: Court: State Vs. A Nobody
प्रकार: कोर्टरूम ड्रामा, सामाजिक नाट्य
दिग्दर्शक: राम जगदीश
निर्माते: प्रशांती तिपिरनेनी, प्रस्तुती – नानी
कलाकार: प्रियदर्शी पुलिकोंडा, हर्ष रोशन, श्रीदेवी अपल्ला, शिवाजी, साई कुमार, रोहिणी, हर्षवर्धन, सुबलेखा सुधाकर
कालावधी: 2 तास 29 मिनिटे
प्रकाशन: 14 मार्च 2025 (थिएटर), 11 एप्रिल 2025 (नेटफ्लिक्स)
भाषा: तेलुगू (हिंदी, तमिळ, कन्नड, मल्याळम डब आणि सबटायटल्ससह)
रेटिंग: 4/5
आमचे इतर लेख वाचण्यासाठी खालील लिंक वर click करा.