information about holi in marathi

Information about Holi in Marathi

होळी सणा बद्दल माहिती 

पौराणिक कथेनुसार, राक्षस राजा हिरण्यकशिपु ने तपस्या करून ब्रह्मदेवाकडून वरदान प्राप्त केले. त्याच्या म्हणण्यानुसार, ह्या जगातील संपूर्ण जीवजंतू, राक्षस, देव किंवा मानव त्याचा वध करू शकणार नाही. तो न दिवसा मारला जाईल, न रात्री, न आकाशात, न जमिनीवर. कुठलेही शस्त्र त्याला मारू शकणार नाही.(Information about Holi in Marathi) असं वरदान मिळाल्यानंतर हिरण्यकशिपु स्वतःला देव मानू लागला. विष्णू देवाची जशी पूजा-अर्चना केली जाते, तशीच त्याचीही पूजा करावी, असा आदेश तो आपल्या प्रजेला देतो. तसेच, विष्णू देवाची पूजा न करण्याचाही आदेश देतो.

होळीच्या हार्दिक शुभेच्या ! । Information about Holi in Marathi

प्रह्लाद विष्णू देवाचा फार मोठा भक्त असल्यामुळे, त्याने आपल्या वडिलांची आज्ञा न पाळता विष्णू देवाची पूजा सुरूच ठेवली. हिरण्यकशिपु आपल्या मुलाला म्हणजेच प्रह्लादला अनेक शिक्षा देतो, पण तरीही प्रह्लाद विष्णू देवाची आराधना करणे सोडत नाही.

एक दिवस, हिरण्यकशिपु आणि त्याची बहीण होलिका मिळून एक योजना आखतात. होलिकाकडे एक चादर किंवा वस्त्र होते, जे तिने अंगावर ओढले की तिला आग लागत नसे किंवा ती आगीपासून सुरक्षित राहू शकत असे. होलिका हिरण्यकशिपुला सांगते की, “मी प्रह्लादला घेऊन चितेवर बसते.”

यानुसार, होलिका प्रह्लादला घेऊन चितेवर बसते. होलिका आपल्या अंगावर तो कपडा ओढते, त्यामुळे तिला आग लागत नाही. प्रह्लाद हात जोडून विष्णू देवाचे स्मरण करतो. आग लावली जाते, आणि अचानक विष्णू देवाच्या कृपेने तो कपडा प्रह्लादवर पडतो, परिणामी होलिका जळून खाक होते. वाईटावर चांगल्याचा विजय व्हावा आणि आपल्यातील अहंकार, द्वेष, नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठी होळी साजरी केली जाते. असे म्हणतात की, वसंत ऋतूचे स्वागत करण्यासाठीही होळी साजरी केली जाते.

होळी कशी साजरी केली जाते ? | How to celebrate Holi in Marathi

होळी साजरी करण्यासाठी, आजही गावागावांत होळी पेटवण्याआधी घरांवर गवऱ्या थापून वाळत घातलेल्या दिसतात. प्रत्येक घरासमोर छोटी गवऱ्यांची आणि लाकडांची होळी केली जाते. त्यासोबतच, गल्लीत किंवा गावाच्या चौकात मित्रांचा गट मिळून मोठी होळी पेटवत असतो.

मथुरा, वृंदावन, गोवर्धन, गोकुळ, नांदगाव, बरसाणा या ठिकाणी श्रीकृष्णाशी संबंध असल्यामुळे इथे होळी फार मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी खालील लिंक वर click करा.

“स्थळ” मराठी चित्रपट review In Marathi

Leave a Comment