sthal Marathi movie review

                    योग्य चित्रपटांची डायट!

sthal Marathi movie review

आपले आरोग्य छान राहावे यासाठी काय खाल्लं पाहिजे आणि काय खाल्लं नाही पाहिजे याची आपण फार बारकाईने काळजी घेतो. म्हणूनच आजकाल आरोग्याची काळजी घेण्यासाठी बरीच लोक योग्य तो डायट follow करत असतात. जिभेला चवीचा चटका असतो हे खरं, पण मसालेदार पदार्थ आणि फास्ट फूडचे सेवन जेव्हा आपण अगदी आनंदाने करत असलो तरी आपल्या शरीरासाठी ते किती harmful आहे हे आपल्याला चांगलंच माहित असतं. म्हणून शरीर निरोगी ठेवण्यासाठी जिभेच्या चवीपेक्षा त्यात असलेल्या content चा विचार करावा लागतो. अगदी चित्रपटांचं सुद्धा असंच आहे आणि जर तुम्ही योग्य चित्रपटांची डायट ठेवणारे रसिक आहात तर हा ब्लॉग तुमच्यासाठीच आहे. (sthal Marathi movie review)

नुकताच महिला दिन विशेष जयंत सोमलकर दिग्दर्शित “स्थळ” (sthal Marathi movie review) हा मराठी दर्जेदार चित्रपट box office मध्ये रिलीज झाला. पण मराठी चित्रपटाला अगदी फारच कमी screen मिळत असल्यामुळे आणि त्यात मराठी प्रेक्षकांची संख्या कमी पडली की तो चित्रपट अवघ्या ४ ते ५ दिवसांत box office वरून काढला जातो. म्हणून असे बरेच दर्जेदार मराठी चित्रपट प्रेक्षकांना पाहायचे राहून जातात. समाजात काय वाईट घडतं आणि काय चांगलं घडतं ह्या गोष्टींना entertainment च्या स्वरूपात मांडून लोकांना विचार करण्यास भाग पाडणारा हाच तो चित्रपट ज्याला आपण समाजाचा आरसा मानतो.

“स्थळ”   ह्या चित्रपटाची सुरुवात मुलीच्या बघण्याच्या कार्यक्रमापासून होते. मुलीला पाहायला आलेले पाहुणे, त्यांना दिलेला मानपान, घराच्या अंगणात हात-पाय-तोंड धुण्यासाठी ठेवलेले पाणी आणि साबण, त्या पाण्याने हात-पाय धुऊन तोंडात पाणी ठेऊन गुळण्या करणे, वडीलधाऱ्या माणसांसोबत बैठक बसणे, चहा आणि पोहे झाल्यानंतर मुलीला समोर स्टूलवर बसवून तिला प्रश्न विचारणे – हे सगळं पाहत असताना हा एक चित्रपट नसून हे अगदी reality मध्ये आपल्या समोर घडत आहे, असा अनुभव येतो.

सविता ही चित्रपटातील मुख्य नायिका असते. जी दिसायला सावळी असल्यामुळे सतत मुलांकडून नकार मिळत असतो आणि त्यामुळे तिला हे सगळं अपमानास्पद वाटतं. B.A. च्या शेवटच्या वर्षाला शिकत असलेली सविता समाजशास्त्र विषयासोबत MPSC ची तयारी करत असते. MPSC च्या परीक्षेच्या दिवशी बघायला पाहुणे येणार म्हणून नाइलाजाने तिला परीक्षेला जाणं टाळावं लागतं. कारण परीक्षेमुळे एक वर्ष वाया जाईल, पण चांगलं स्थळ नाही मिळालं तर अख्खं आयुष्य वाया जाईल, असं म्हणून सविताची आई तिची समजूत काढते.

चित्रपटातील एक सीन मनाला घाव करून जातो – छोटीशी मुलगी सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त भाषण करत असते. त्यातून असं समजतं की सावित्रीबाई फुलेंनी आपलं संपूर्ण जीवन स्त्री शिक्षण आणि त्यांच्या स्वातंत्र्यासाठी लढण्यात व्यतीत केलं. त्यासोबत त्यांना अपमान आणि दगडांचा मार सहन करावा लागला. आज जवळपास १५० वर्षं झाली तरीही सविता सारख्या कित्येक मुलींना ह्या पुरुषप्रधान विचारसरणीला तोंड द्यावं लागतं.

शेजारच्या मुलींची होत असलेली लग्नं आणि आपल्या मुलीचं लग्न होत नसल्याची चिंता सविताचे वडील बाळगतात. समाजातील लोक लेकीच्या लग्नाबद्दल विचारत असलेले प्रश्न त्यांच्या मनात सतत टोचत राहतात. एकीकडे women empowerment बद्दल दिली जाणारी व्याख्यानं आणि दुसरीकडे परंपरांनी ग्रासलेली मानसिकता यावरून हेच जाणवतं की पुस्तकातील ज्ञान फक्त syllabus पुरतं आहे.

लग्न म्हणजे फक्त लग्न नाही, तर देवाणघेवाण करून हिशेब बरोबर ठेवण्याचा प्रकार आहे. मुलाला सरकारी नोकरी असली की त्याचा भाव वाढतो. म्हणजे बाजारात भाजी विकत घेताना तिची quality चांगली असेल तर त्यात एक रुपयाही कमी केला जाणार नाही आणि उधारीवरही दिली जाणार नाही. कापसाला चांगला भाव नाही म्हणून पूर्ण कापूस घरी परत आणला जातो, पण लेकीचं लग्न जवळ आलं की हुंड्याची रक्कम जमवण्यासाठी तोच कापूस फुकट भावात विकला जातो. रक्कम पूर्ण जमा झाली नाही तर शेती विकावी लागते आणि शेती विकली गेली तर बाकी कुटुंबाचं कसं होईल ह्या विचारात तो बाप आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतो.

चित्रपटाने पुरुष वर्चस्व आणि परंपरांनी ग्रासलेल्या समाजाला मारलेली चापट आणि प्रेक्षकांवर सोडलेलं प्रश्नचिन्ह खरंच विचार करण्यास भाग पाडतं.

आता तुम्हीच ठरवा –
असा खडा सवाल “स्थळ” चित्रपट शांतपणे न बोलता, हसत-खेळत बोलून जातो.

sthal movie trailer

आमचे नवीन लेख वाचण्यासाठी खालील लिंक वर click करा :

सदैव जिंकणारी ती – मराठी कविता

एक स्वप्नातलं घर कविता

1 thought on “sthal Marathi movie review”

  1. अप्रतिम लेख लिहिल्या बदल आपले हार्दिक अभिनंदन

    Reply

Leave a Comment